चिंबळी -गणेशोत्सव अवघ्या एक महिन्यावर आला आहे. मरकळ येथील कुंभारवाड्यात गणेशमूर्ती बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून केवळ रंगकाम राहिले आहे.
या परिसरात गणेश मंडळे मूर्ती बुकिंग करण्यासाठी एक महिना अगोदर येत असतात; परंतु यावर्षी करोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने व राज्य शासनाच्या आदेशानुसार उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.
याचा परिणाम म्हणून मूर्तीना मागणी कमी प्रमाणात आहे. लॉकडाऊनमुळे मूर्ती बनविण्याचे साहित्य बाजारात उशिरा मिळाले असल्याने कमी अवधी मिळाला. यंदा मूर्तींची उंची एक ते तीन फुटांपर्यंतच ठेवण्यात आली असल्याचे कारागीर संभाजी कुंभार यांनी सांगितले.