पंजाब ऍन्ड सिंध बॅंकेत 71 कोटींचा घोटाळा

 

 

नवी दिल्ली-  पंजाब आणि सिंध बॅंक या राष्ट्रीयकृत बॅंकेत 71 कोटी 18 लाख रूपयांचा घोटाळा झाला असल्याची तक्रार रिझर्व्ह बॅंकेकडे आणि सीबीआयकडे करण्यात आली आहे. महा असोसिएटेड हॉटेल्स या संस्थेच्या खात्यावर हा घोटाळा झाला आहे असे बॅंकेने म्हटले आहे. या संस्थेने बॅंकेचे तेवढ पैसे बुडवले असून ते कर्ज खाते एनपीए म्हणून घोषित करण्यात आले आहे. या एकूण कर्जापैकी घोटाळ्याची रक्कम 44 कोटी 40 लाख रूपये इतकी आहे.

याच बॅंकेत या आधी एप्रिल महिन्यात गोल्डन ज्युबिली हॉटेल्स या संस्थेने 86 कोटी रूपयांचा घोटाळा केला आहे. या घोटाळ्याच्या बातमीनंतर शेअर बाजारातील या बॅंकेच्या शेअरची किंमत घटली. ही घट 0.71 टक्‍के इतकी असून या शेअरचा आजचा भाव 13 रुपये 95 पैसे इतका नोंदवला गेला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.