पुणे – येत्या काही दिवसांवर गणपती उत्सव आला आहे. कोरोनामुळे यंदाचा उत्सव अगदी साधेपणाने साजरा होतोय, मात्र मराठमोळ्या पेहरावातील आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला फेटा आकर्षक रंगसंगती व विविध प्रकारच्या स्टाईलमुळे गणेशभक्तांना भुरळ पाडू लागला आहे.
घरोघरी येणान्या लाडक्या गणरायाचे रूप अधिक देखणे दिसावे यासाठी जरीची बॉर्डर असलेल्या तसेच अगदी पारंपरिक काठापदराच्या सहावा किया नऊवारी साड्यांच्या पटांना गणेशभक्तांकडून मागणी आहे.
बाजारात यंदा पहिल्यांदाच विविध प्रकारचे फटे उपलब्ध झाले असून यामध्ये कृष्ण पगडीपासून शाही फेट्यांना सर्वाधिक पसंती आहे.
जय मल्हार पगड़ी बिना तुप्याचा बिन सोन्याचा हा फेटा काहीसा पगडीसारखा दिसतो
कृष्ण पगड़ी – सतरंगी रंगाच्या पगडीवर फुलांची आकर्षक मांडणी करून साकारण्यात येते. त्यानंतर त्यावर मोरपंख लावल्याने ती अधिकच आकर्षक दिसते.
कोल्हापुरी फेटा – भरगच्च तुज्यामुळे आणि बांधणीसारख्या रंगसंगत एक वेगळीच ऐट फेटा बां येते. फेट्याचा लांबलचक सोगा एका खांद्यावरून पुढे घेऊन दु खांद्यावर मागे टाकून एक वेगळा लूक दिसतो.
स्वामीनारायण फेटा – मोहक अबोली रंगातला फेट्याचा हा प्रकारच्या चांगलाच चर्चेत आहे. पगडीसारखा याला तुरा व सोगा नसतो, मात्र इतर फेट्यापेक्षा याचा आकार मोठा असल्यामुळे हा कोल्हापुरी पेट्यासारखा भरगच्च दिसतो
पुणेरी फेटा- या ट्याच्या साध्या रंगसंगतीमुळे याला विशेष पसंती आहे. छोटासा तुरा आणि छोटा सोगा यामुळे तो अधिक शोभून दिसतो.
मूर्तीची नोंदणी झाल्यानंतर मागणीनुसार तिला फेटा, उपरणे व पितांबराने सजविण्यात येते. त्यासाठी जवळपास एक ते दीड तास लागतो. फेट्यासाठी लागणारे कापड तसेच त्यावर करण्यात येणारी कलाकुसर पानुसार दर ठरतात. फेट्याचा तुरा करताना त्यामध्ये कॅनव्हासचा वापर करण्यात येतो.
-अतुल नाझरे (वाल्हेकर), फेटा बांधणारे कलाकार