बहुप्रतीक्षित “बंटी और बबली-2′ चित्रपटातून शर्वरी वाघ ही बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. या डेब्यू चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच शर्वरी आपल्या सौंदर्य आणि अभिनयामुळे एक स्टार म्हणून प्रसिद्धी मिळवत आहे. शर्वनीने आणखी एका मोठ्या जाहिरातीसाठी करार केला आहे.
शर्वरी वाघने “एल-18’शी हा करार केला आहे. भारतामध्ये पॉन्ड्ससाठी एक नवीन चेहरा म्हणून करारबद्ध झाल्यानंतर हे वृत्त हाती आले आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या दोन मोठ्या ब्रॅंडशी हातमिळवणी आणि आदित्य चोप्रासोबत झालेल्या तीन चित्रपटांच्या डीलमुळे शर्वरीकडून अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास शर्वरी लवकरच आपल्या आगामी बिग बजेट चित्रपटाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यामुळे इंडस्ट्रीमध्ये शर्वरी चर्चेचा विषय ठरली आहे. शर्वरी एक अशी अभिनेत्री आहे, जिला इंडस्ट्रीमध्ये अनेक जण फॉलो करत आहे. तसेच चाहते तिच्या “बंटी और बबली-2′ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.