पिंपरी – पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन तुला नांदायला घरी घेऊन जातो, असे खोटे सांगून एका महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी सातारा ग्रामीण पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना पिंपळे गुरव येथे घडली.
शिवाजी बबन भोसले असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. सध्या तो सातारा ग्रामीण पोलीस मुख्यालय नियंत्रण कक्ष येथे कार्यरत आहे. याबाबत पीडित महिलेने सोमवारी (दि. 2) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 28 फेब्रुवारी 2021 ते 15 जून 2021 या कालावधीमध्ये शिवम बिल्डिंग, ओंकार कॉलनी, पिंपळे गुरव येथे घडली.
पहिल्या बायकोपासून घटस्फोट घेतल्यानंतर तुला नांदायला घेऊन जातो, असे वारंवार खोटे बोलून फिर्यादी यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. शिवीगाळ करून बदनाम करण्याची धमकी दिली. तसेच वारंवार हाताने मारहाण केली. या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक सोळुंके अधिक तपास करीत आहेत.