पिंपरी – अकरा वर्षीय मुलीवर शेजाऱ्याकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना संत तुकाराम नगर, भोसरी येथे घडली. याबाबत 30 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने 11 वर्ष सहा महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला जेवण वाढण्याच्या बहाण्याने घरात बोलावून घेतले. तसेच पीडित मुलीच्या घरात झोपण्याचा बहाणा करून तिच्यावर पाच ते सहा वेळा लैंगिक अत्याचार केला.
याबाबत घरातील लोकांना काही सांगू नकोस अशी आरोपीने पीडित मुलीला धमकी दिली. मात्र अल्पवयीन पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.