नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर केलेल्या संभाषणात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी काश्मिर प्रश्नाचा मुद्दा उपस्थित केला. या भागातील घडामोडींवर आपला देश लक्ष ठेऊन आहे, असे त्यांनी सांगितले.
इल्सी पॅलेसने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्रित काम करण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले. मात्र भारत सरकारने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात काश्मिरच्या मुद्द्याचा समावेश नाही.
15 देशांच्या राजदुतांची काश्मिर भेट आणि नवी दिल्लीत युरोपीयन महासंघ परराष्ट्र महासंघाशी चर्चा सुरू असताना ही बाब पुढे आली आहे. विश्वास आणि मोकळेपणा ही या दोन नेत्यांमधील संवादाचे वैशिष्ट्य होते. काश्मिरच्या मुद्द्यावर या दोन नेत्यांनी चर्चा केली. तेथील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत असे फ्रान्सने महटले आहे.
अमेरिका, नॉर्वे आणि दक्षिण कोरीयासह 15 देशांचे राजदूत काश्मिरच्या परिस्थितीची पहाणी करण्यासाठी त्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. युरोपीयन महासंघाच्या राजदुतांच्या दौऱ्याच्या तारखा अद्याप निश्चित केल्या नाहीत, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.