रहाटणी, (वार्ताहर) – क्रांती सखी मंचच्या वतीने पिंपळे सौदागर व रहाटणी परिसरातील महिलांसाठी मोफत फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये कपडे रंगविणे, आरी वर्क, विविध प्रकारचे ड्रेस, घागरा, वन पीस, कटिंग व स्टिचिंग शिकविण्यात आले. याचबरोबर शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
माहिती अभावी महिला या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत असे महिलांनी सांगितले. प्रशिक्षण चालू असतानाच महिलांना आपण शिवलेल्या कपड्यांमधून उत्पन्न मिळू लागले. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. प्रशिक्षणामुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतील, अशी अपेक्षा स्वाती भिसे यांनी व्यक्त केली.
प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणार्या महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले. प्रशिक्षण स्वाती भिसे यांनी दिले. कार्यक्रमाचे नियोजन क्रांती सखी मंचच्या महिलांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैशाली काटे, रुपाली काटे व प्राजक्ता झिंजुर्डे यांनी परिश्रम घेतले.