पारनेर, (प्रतिनिधी) – शतकोत्तर वाटचाल करत असलेल्या पारनेर सार्वजनिक वाचनालयात ज्येष्ठ साहित्यिक वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस, मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहाने व मान्यवरांच्या उपस्थित साजरा करण्यात आला.
यावेळी पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले. साहित्यिकांचाही गौरव करण्यात आला. गटविकास अधिकारी जोस्ना मुळीक यांचेहस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. अनेक वाचकांनी प्रदर्शनास भेट दिली.
दुपारी पारनेर तालुक्यातील चार साहित्यिकांचा वाचनालयातर्फे गौरव करण्यात आला. यात कवी संजय पठाडे, प्रवीण जाधव, संदीप राठोड , अशोक गायकवाड या तालुक्यातील साहित्यिकांचा सन्मान ग्रंथालयाचे अध्यक्ष विजय डोळ यांनी केला.
उपस्थितीत मान्यवरांनी ग्रंथालय राबवत असलेले उपक्रम व वाचकांना देत असलेली सेवा याबाबत ग्रंथालय चालकाचे कौतुक केले. कार्यक्रमाला लेखापरीक्षक दादासाहेब गायकवाड, सुवर्णा डोळ, वेदिका बोरुडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.