भोर – कारोनो व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एस टी स्टॅण्ड, भाजी मंडई, पोलीस स्टेशन, रिक्षा चालक, नगरपालिका सफाई कामगार, छोटे मोठे हॉटेल्स आदी ठिकाणी उन्नती महिला प्रतिष्ठानच्या वतीन कापडी मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी या आजाराला सामोरे जाण्यासाठी आपण सर्वजण स्वतःची काळजी घेऊ या, स्वच्छता, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, योग्य आहार घेणे, याबरोबरच सर्दी, तापाची लक्षणे दिसल्यास त्वरीत वैद्यकीय सल्ला घेऊन या आजारापासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमा तनपुरे यांनी येथे केले.