मंचर – नांदूर (ता. आंबेगाव) येथे मेंढपाळाच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून एक करडू मंगळवारी (दि. 17) सकाळी ठार केले आहे, तसेच एका शेतकऱ्याच्या करडूवर हल्ला करून त्याला जखमी केले .
मेंढपाळ पल्हाजी पावश्या तांबे याचे करडू बिबट्याने उचलून नेले, तर प्रकाश भोर यांच्या करडूच्या गळ्याला-पोटावर बिबट्याने चावा घेतला आहे. करडूच्या ओरडण्याचा आवाज ऐकून घरातील मंडळी बाहेर आल्याने बिबट्याने पलायन केले. मेंढपाळ पल्हाजी तांबे यांचे दहा हजारांचे आणि प्रकाश भोर यांचे दहा हजारांचे नुकसान झाले असल्याची माहिती सरपंच शेखर चिखले यांनी दिली.
घटनास्थळी वनविभाग अधिकारी कैलास दाभाडे, वनमजूर कोंडीभाऊ डोके, अरविंद वायाळ, नारायण चिखले, अण्णा भालेराव, संपत भालेराव, गंगाराम भालेराव यांनी भेट देऊन पाहणी केली.
शेतकरी ज्ञानेश्वर जाधव आणि विलास भालेराव यांच्या उसाच्या शेतात बिबट्याला दिवसाही शेतकऱ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, ग्रामस्थांनी केली आहे.
चांडोली रस्त्यावर विकासवाडी येथे चिमा सोमा ढेकळे यांच्या मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून एक मेंढी व एक शेळीचे कोकरू ठार केले आहे. यामुळे त्यांचे सुमारे 30 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती वनाधिकारी रईस मोमीन यांनी दिली. सोमवारी (दि. 16) पहाटे बिबट्याने हल्ला करून कळपातील एक मेंढी व एक कोकरू ठार केले. घटनेचा पंचनामा वनाधिकारी रईस मोमीन व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.