मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोलीत मोफत करोना लसीकरण मोहीम

थेऊर – शिवसेनेचा प्रत्येक शिवसैनिक समाजासाठी आणि त्याचा प्रत्येक क्षण समाजाच्या विकासासाठी आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या या विचारातून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार आज परिसरातील नागरिकांसाठी लसीकरण मोहिम सुरू केली आहे, या मोहिमेचा शुभारंभ करताना समाजभान ठेवून कर्तव्य पूर्णत्वाचे समाधान मिळत असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर कटके यांनी सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोली येथील बी.जे.एस. कॉलेज येथे ज्ञानेश्‍वर (माऊली-आबा) कटके यांनी स्व:खर्चातून करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे. याद्वारे परिसरातील पाच ते सहा हजार नागरिकांना पहिल्या टप्यात मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ कटके यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

कटके यांनी सांगितले की, तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभुमीवर लसीकरण वेगाने होणे गरजेचे आहे. याकरिता मुख्यमंत्री ठाकरे यांनी आरोग्य यंत्रणेस आदेशही दिले आहेत. त्यानुसार समाज कर्तव्यातून वाघोली परिसरातील नागरिकांकरिता लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे. करोनापासून संरक्षण करणे या उद्दशातून सदर मोहिम राबविली जात असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कटके यांनी नागरिकांना केले आहे.

वाघोलीत सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आयोजक शिवसैनिकांकडून योग्यरित्या नियोजन करण्यात आल्याने करोना सुरक्षा नियमांतर्गत नारिकांना लसीकरण केले जात आहे. पाहिल्या टप्यात पाच ते सहा हजार नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे अयोजकांकडून सांगण्यात आले.

या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय सातव पाटील, पं.स. सभापती नारायण अव्हाळे पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य रामकृष्ण सातव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र सातव पाटील, सुरेश बापू सातव, मीनाकाकी सातव पाटील, मिलिंद हरगुडे, युवराज दळवी, राजेंद्र पायगुडे, मारुती आण्णा गाडे, अशोक काळे, पिंटूशेठ कटके, गणेश गोगावले, संदीप सातव, अनिल सातव, नंदकुमार भाडले, दत्तात्रय बेंडावले, नवनाथ गोगावले, संदीप शिंदे, विशाल सातव पाटील, मंगेश सातव, महिला बचत गट अध्यक्षा प्रियाताई कुसाळकर, कविता दळवी, पाचारणे ताई, अर्चना भाडले, घोलप ताई, संदीप जाधव, नवनाथ सातव, सुनील जाधवराव, संदीप जाधव, योगेश सातव, दत्ताशेठ जगताप, घनश्‍याम सातव, शैलेश तुपे, शिवाजी सातव, उत्तम लोले, विकास सातव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

आरोग्य यंत्रणेकडून लसीकरणाचे नियोजन केले जात असले तरी पुरवठ्या अभावी त्यास मर्यादा येत आहेत. लसीचा तुटवडा असल्याने त्यातून अनेक नागरिक लसीकरणापासून वंचीत राहत आहेत. यामुळे वाघोली परिसराचे संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
ज्ञानेश्‍वर (आबा) कटके, शिवसेना जिल्हा प्रमुख, जि.प.सदस्य

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.