मलठण, (वार्ताहर)- आदिवासी कोळी महादेव समाज उन्नती संस्था पुणे विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून व कोळी महासंघाचे सिद्धटेक महादेव कोळी समाज यांच्या सहकार्याने शुक्रवार दि २९ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजता सिद्धटेक येथे सिध्दीविनायक मंदिराशेजारी राज्यव्यापी कोळी महादेव वधुवर मोफत व्हाट्सएप ग्रुपच्या वतीने तृतीय मेळाव्याचे आयोजन केले आहे.
मेळाव्याला संस्था कोणत्याही प्रकारची फी नोंदणी आकारली जाणार नाही. हा मेळावा निशुल्क आहे. फक्त वधुवरांचे बायोडाटा नोंदणी, वाचन व वधुवरांचे ओळख, चर्चासत्र तसेच भोजन या स्वरूपाचे नियोजन केले आहे. मेळाव्यात दौंड, कर्जत, श्रीगोंदा, इंदापूर, बारामती, शिरूर आदी तालुक्यांतील वधुवरांना मध्यवर्ती हे ठिकाण आहे.
महाराष्ट्रातील सर्वच आदिवासी कोळी बांधवांना येण्यासाठी जाण्यासाठी सोयीस्कर आहे. मेळाव्यासाठी कर्जत, दौंड, श्रीगोंदा, इंदापूर, बारामती, शिरूर, पुणे, अहमदनगर, सोलापूर, बीड, जामखेड, बीड, सांगली, सातारा, मुबंई आदी ठिकाणवरून समाज बांधव सहभागी होणार आहे. बहुसंख्य वधुवरांनी सहभागी व्हावे, अशी माहिती गोविंद गायकवाड यांनी दिली.