राहू, (वार्ताहर)- टाकळी भीमा (ता. दौंड) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनात बालचमूंची पावले थिरकली. लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून असे कार्यक्रम आयोजित कण्यात येतात. त्यांच्या कलागुणांना भविष्यात वाव देता येतो. याच उदात्त हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी कला सादर केली. पहिलीपासून ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी कला सादर केली. नृत्य, नाटक, एकपात्री, सोशल मीडियाचे दुष्परिणाम आदी प्रकारचे कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. याकामी विद्यार्थ्यांची तयारी करण्यासाठी दिनेश नरसाळे यांचे सहकार्य लाभले.
यावेळी सरपंच राहुल वडघुले, उपसरपंच प्रितम कुंभार, माजी सरपंच पोपट वडघुले, माजी सरपंच निखिल ठाकुर, सदस्या अल्पना ठाकुर, मच्छिंद्र नरसाळे, शिक्षण समितीचे अध्यक्ष संदीप पांगारकर, संतोष गरदरे, वाल्मिक ठाकुर उपस्थित होते. मुख्याध्यापक राजू देवकर, कांबळे सर, शेळकंदे सर, पिलाने सर उपस्थिती होते. सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी पिलाने यांनी केले. राजू देवकर यांनी आभार मानले.