ऑनलाइन खरेदीतून फसवणुकीचा फंडा

ऍड. नंदकिशोर शेलार

चौफुला – दौंड तालुक्‍यात ऑनलाइन खरेदी- विक्रीत लाखो रुपयांची फसवणूक केली जात आहे. यात परराज्यातील अनेक टोळ्या यात सामील झाले असल्याने महिन्यांकाठी जिल्ह्यात एक घटना घडत आहे. सायबर क्राईमच्या कक्षेत असलेले हे घोटाळे दौंड तालुक्‍यालाही कवेत घेत आहेत. यातून कोट्यवधी रुपयांचा आकडा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या दहा ते बारा वर्षांत घरबसल्या खरेदी- विक्रीची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वेळ आणि पैशांची बचत आदी कारणांमुळे दगदगीच्या काळात खरेदी आणि विक्रीदारांना दिलासा मिळाला आहे. यातून दिवसाकाठी लाखों रुपयांची उलाढाल होत आहे. दौंड तालुका हा सधन आहे. या तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन ट्रेंडीग होत आहे.

याचा फायदा खरेदीदार आणि विक्रेत्यांना होत असला तरी यातून फसवणुकीच्या घटना वारंवार चव्हाट्यावर येत आहेत. बागायती आणि औद्योगिक टापूतील गावे ही याला घटनेला बळी पडत आहेत.

काहीजण नवनवीन वस्तू खरेदी करतो. कोणी परिस्थिती नसल्यामुळे किंवा पैसे नसल्यानाने ते जुन्या वस्तू घेतात. काही लोक नवीन वस्तू घेतात. जुन्या वस्तूंचे करायचे काय? तर त्या वस्तू एक परदेशी कंपन्यांकडून विक्री करीत आहे. जुन्या वस्तूंची चांगली किमत मिळत आहे. त्यामुळे या ऍपचा वापर लोक मोठ्या प्रमाणात करीत आहेत.

काही व्यक्‍ती नवीन गाडी घेण्यासाठी जुनी गाडी कोठे मिळते, याचा शोध घेत आहे. त्यांच्या बजेटमध्ये एखादी गाडी मिळाली की ती लगेच खरेदी करतात. परंतु गाडी कोठे मिळते, याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या फसगतीला सुरूवात होत आहे. हा गुन्हा सायबर क्राईमच्या कक्षेत येत असल्याने पोलिसांनी याबाबत सजग राहून नागरिकांमध्ये प्रबोधन करण्याची
आवश्‍यकता आहे.

परराज्यातील टोळ्या “कनेक्‍ट’
एखादा खरेदीदार गाडी घेताना किंमत, गाडी निर्माण वर्ष, किती किलोमीटर रनिंग, पासिंग, आतापर्यंत कितीजणांना विकली आहे, हे पाहतो. मार्केट रेटपेक्षा 2 लाखांनी कमी किंमत मिळाली तर लगेच घेतो. खरेदीदार गाडीमालकाशी संपर्क साधतो. गाडी घेणारा मालक परराज्यात असल्याचे सांगतो.

खरेदी करणारा आणि गाडी मालक देशातील इतर राज्यात असतात. खरेदीदार हा दुसऱ्या राज्यात असल्याने त्यांना गाडी पाहण्यासाठी मालक वाहतूक खर्चासाठी दहा हजार खात्यात जमा करण्यास सांगतो. गाडीमालकाच्या खात्यात रक्‍कम जमा झाल्यानंतर त्या चालकाचा मोबाइल क्रमांक पाठविला जातो.

त्यानंतर खरेदीदार त्या क्रमांकावर संपर्क साधला तर मोबाईल स्वीच ऑफ दाखवितो. ही फसवणुकीनंतर फसवणूकदार पोलीस स्टेशनला धाव घेतो. दौंड तालुक्‍यात ऑनलाइन फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत.

सर्वत्र फसवणुकीच्या घटना घडत आहेत. कमी किमतीच्या वस्तूला तसेच आमिषाला बळी पडू नका. शक्‍यतो ऑनलाइन खरेदी करणेच टाळा. तसेच ओटीपी कोणालाही देऊ नका.या वस्तूंबाबत 100 टक्‍के शाश्‍वती बाळगून वस्तू खरेदी करावी. परंतु जेवढे होईल तेवढे ऑनलाइन खरेदी करणे टाळावे.
– नारायण पवार, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, यवत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.