52 लाखांचे कर्ज काढून खातेदाराची फसवणूक

शिरूर, दि. 22 (वार्ताहर) – येथील साई मल्टीस्टेट को-ऑप ऍग्रीकल्चर सोसायटीमध्ये अरविंद रामदास घावटे यांचे खाते आहे. त्यांच्या ठेव पावत्या घेऊन त्यांच्या बनावट सह्या करून त्यावर 52 लाखांचे कर्ज काढून त्यांची फसवणूक केली आहे, याप्रकरणी साई मल्टीस्टेटचे अध्यक्ष, संचालक मंडळ, व्यवस्थापक यांच्यासह 14 जणांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी वसंत फुलाजी चेडे, दत्तात्रय सहादु सोनावळे, अशोक फुलाजी चेडे, गणेश रंभाजी सांगळे, संदीप प्रभाकर रोहकले, उज्वला अप्पासाहेब नरोडे, रेखा संतोश घोरपडे, इंद्रभान हरीभाऊ शेळके, विनायक सखाराम जाधव, ज्ञानेश्‍वर बाळासाहेब औटी, राजेंद्र अमष्तलाल दुगड, सुनील अनंतराव गाडगे, प्रशांत राजेंद्र बढे, श्रीकांत पोपट झावरे (सर्व रा. पारनेर ता. अहमदनगर) यांच्यावर शिरूर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अरविंद रामदास घावटे (रा. रामलिंग घोटीमळा ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.

साई मल्टीस्टेट को-ऑप ऍ्रग्रीकल्चर सोसायटी लि. पारनेर शाखा शिरूर संस्थेचे अध्यक्ष चेडे यांनी ऑडीट आहे, असे सांगुन माझ्याकडुन सप्टेंबर 2020 मध्ये ठेव पावत्या जमा करून घेतल्या आहेत. त्या पावत्यांवर मी गेले अडीच वर्षापूर्वीच कर्ज काढले आहे, असे दाखवून व खोटे ठेव पावती कर्ज प्रकरण तयार केले आहे. संस्थेचे अध्यक्ष वसंत फुलाजी चेडे, उपाध्यक्ष दत्तात्रय सहादु सोनावळे, संचालक अशोक फुलाजी चेडे, गणेश रंभाजी सांगळे, संदीप प्रभाकर रोहकले, उज्वला अप्पासाहेब नरोडे, रेखा संतोश घोरपडे, इंद्रभान हरीभाऊ षेळके, विनायक सखाराम जाधव, ज्ञानेश्‍वर बाळासाहेब औटी, राजेंद अमष्तलाल दुगड, सुनील अनंतराव गाडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत राजेंद्र बढे व शाखाधिकारी श्रीकांत पोपट झावरे यांनी संगनमत करून माझा विश्‍वासघात केला आहे. संस्थेत ठेवलेल्या 60 लाखांच्या ठेव पावतीवर बोगस सहया करून बनावट कागदपत्र तयार करून कर्ज काढुन माझी 52 लाख रूपयांची फसवणूक केली आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.