आग रामेश्‍वरी, बंब सोमेश्‍वरी

कृणाल पंड्याशी झालेला वाद हुडाला भोवला

मुंबई – सय्यद मुश्‍ताक अली स्पर्धेतून अचनाक माघार घेतलेल्या अष्टपैलू दीपक हुडाला बडोदा क्रिकेट संघटनेने यंदाच्या देशांतर्गत मोसमातून निलंबीत केले आहे. खरेतर स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी बडोदा संघाचा कर्णधार कृणाल पंड्याशी हुडाचा वाद झाला होता, त्यावेळी पंड्याने हुडाला कारकीर्द संपवेन अशी धमकीही दिली होती. मात्र, संघटनेने कृणाला क्‍लिन चिट देत कारवाई केवळ हुडावर केली आहे. यातूनच आग रामेश्‍वरी व बोब सोमेश्‍वरी अशीच ही कृती म्हणावी लागेल. 

हुडावर निलंबनाची कारवाई करताना संघटनेत दोन गट पडले होते. त्यानंतरही त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हुडाने स्पर्धेतून माघार घेण्यापूर्वी संघटनेशी चर्चा करायला हवी होती. त्याने अचानक निर्णय घेऊन चूक केली, असे संघटनेने सांगितले आहे. मात्र, त्यासाठी संपूर्ण हंगाम त्याच्यावर बंदी घालणे चुकीचे ठरले म्हणूनच काही सदस्यांमध्ये मतभेदही झाले होते. मात्र, त्यानंतरही हुडावर कारवाई झाली.

पांड्याने शिवीगाळ केल्याची तसेच कारकिर्द संपवण्याची धमकी दिली अशी तक्रार करत हुडाने केली होती. तसेच अखेरच्या क्षणी मुश्‍ताक अली स्पर्धेतून माघार घेतली होती. सराव करत असताना पंड्या व हुडामध्ये वाद झाला.

त्यानंतर पंड्याने शिवीगाळ केली आणि कारकीर्द संपवण्याची धमकी दिली. त्यामुळे मुश्‍ताक अली स्पर्धेतून माघार घेत आहे, अशी तक्रार त्याने बीसीसीआयकडे ईमेलद्वारे केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.