इस्रायलने केले सिरीयामध्ये हवाई हल्ले

बैरुत  – इस्रायलच्या लढाऊ विमानांनी मध्य सिरीयामध्ये अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ला केला. या हवाई हल्ल्यामध्ये किती जण मारले गेले याचा आकडा समजू शकलेला नाही. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा हल्ला झाला, असे इस्रायलची सरकारी वृत्तसंस्था असलेल्या सनाने म्हटले आहे.

इस्रायलने यापूर्वीही इराणशी संबंधित सिरीयातील दहशतवादी अड्डयांवर हवाई हल्ले केले आहेत. मात्र दरवेळी या हल्ल्यांची जबाबदारी इस्रायलने स्वीकारली नाही आणि त्याबाबत कोणतेही स्पष्टिकरणही दिलेले नाहई. इस्रायलने केलेले हवाई हल्ल्यांमध्ये हामा या मध्यवर्ती प्रांतातील काही ठिकाणांना लक्ष्य केले गेले, असे सिरीयाच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्याच्यावेळी सिरीयाच्या संरक्षण विभागांनी बहुतेक क्षेपणास्त्रे पाडली, असेही सिरीयाच्यावतीने सांगितले गेले.

अमेरिकेत जो बायडेन यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच इस्रायलने हा हवाई हल्ला केला आहे. अमेरिकेने गेल्यावर्षी बगदादमध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे कमांडर कासेम सुलेमानी यांची ड्रोन हल्ल्यात हत्या केली होती. इराणने या हत्येचा बदला घेण्याचा इशाराही अमेरिकेला दिला होता. तेंव्हापासून अमेरिका आणि इराणमधील संबंध ताणले गेले आहेत.

इस्रायलने गेल्या वर्षी सिरीयामध्ये 39 वेळा हवाई हल्ले केले आणि 135 ठिकाणांना लक्ष्य केले. त्यामध्ये लष्करी ठाणी, गोदामे आणि लष्करी वाहनेही उद्‌ध्वस्त केली असे सिरीयातील मानवी हक्क विषयी निरीक्षक गटाने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.