World Cup 2023 Pakistan vs Bangladesh Match : विश्वचषक 2023 च्या 31व्या सामन्यात आज पाकिस्तानचा सामना बांगलादेशशी होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. या विश्वचषकातील बांगलादेशचा प्रवास जवळपास संपला आहे. त्यांच्याकडे गमावण्यासारखे काही नाही. अशा परिस्थितीत हा संघ इतर संघांचा खेळ खराब करण्याचा प्रयत्न करेल. त्याच वेळी, आता तिन्ही सामने पाकिस्तानसाठी करो किंवा मरोचे असणर आहेत. एका पराभवानेही त्यांचा उपांत्य फेरीचा मार्ग बंद होऊ शकतो.
PAK vs BAN Live Score : बांगलादेशचा कर्णधार शकिबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशला 102 धावांवर चौथा धक्का बसला. लिटन दासला इफ्तिखार अहमदने आगा सलमानच्या हाती झेलबाद केले. त्याला 64 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 45 धावा करता आल्या. लिटनने महमुदुल्लाहसोबत चौथ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली.
सध्या 23 षटकांनंतर बांगलादेशची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 104 धावा आहे. महमुदुल्लाला 48*(50) आणि कर्णधार शकीब अल हसन नुकताच क्रीजवर आला आहे.
पहिला पॉवरप्ले संपला…
1️⃣5️⃣ overs done
Bangladesh are 66-3 with @iShaheenAfridi and @HarisRauf14 among the wickets 🏏#PAKvBAN | #CWC23 | #DattKePakistani pic.twitter.com/7WydyJg6TR
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 31, 2023
बांगलादेशचा कर्णधार शकिबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला पॉवरप्ले संपल्यानंतर म्हणजेच 10 षटकांत बांगलादेशने तीन गडी गमावून 37 धावा केल्या आहेत. याआधी शाहीन आफ्रिदीने तनजी हसन आणि नजमुल हुसेन शांतो आणि हरिस रौफने मुशफिकुर रहीमला बाद केले आहे.
बांगलादेशला सहाव्या षटकात 23 धावांवर तिसरा धक्का बसला. हारिस रौफने मुशफिकर रहीमला रिझवानकरवी झेलबाद केले. रहीमला आठ चेंडूंत पाच धावा करता आल्या. बांगलादेशला दुसरा धक्का तिसऱ्या षटकात सहा धावांवर बसला. शाहीनने नजमुल हुसेन शांतोला उसामा मीरकरवी झेलबाद केले. शांतोला चार धावा करता आल्या.
बांगलादेशला पहिल्याच षटकात पहिला धक्का बसला. शाहीन आफ्रिदीने ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर तनजीद हसनला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला खातेही उघडता आले नाही.