जयपूर : इंडियन प्रीमियर लीग पुरूष खेळाडूंच्या बाबतीत खूपच लोकप्रिय झाली असताना आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिलांच्या आयपीएलची तयारी केली असून, त्यासाठी आता चार संघांची घोषणा केली आहे.
याआधी जयपूरमध्येच या स्पर्धेच्या दोन आवृत्या खेळल्या गेल्या. त्यावेळी तीन संघांचा सहभाग होता. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये सुपरनोव्हाजने व्हेलाॅसिटीवर चार विकेट्सने मात करत विजेतेपद पटकावले होते.
भारतीय संघातील हरमनप्रित कौर, मिताली राज आणि स्मृती मानधना या स्पर्धेचे आकर्षण होत्या. तिसरा संघ आयपीएल ट्रेलब्लेझर्स होता. ही माहिती बीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली आहे.