नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मोठं वक्तव्य केले आहे. येणारी विधानसभेची निवडणूक एनडीए सोबत लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.
विधानसभेच्या २०० जागा जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला. 1 मार्च रोजी नितीशकुमार त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते पाटणा येथील गांधी मैदानावर कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. नितीशकुमार म्हणाले की, आम्ही बिहार विधानसभा निवडणूक एनडीएबरोबर लढवू.
तसेच विधानसभेच्या 200 पेक्षा जास्त जागा जिंकू.या वर्षी बिहार विधानसभा निवडणुका होणार आहेत. बिहार राज्यात विधानसभेच्या 243 जागा आहेत.