नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात शाहीन बागेत कलाम 144 लागू करण्यात आले आहे. शाहीन बागेत पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे.
1 मार्च रोजी हिंदू सेनेने शाहीन बागेत जाऊन निदर्शन संपवण्याची घोषणा केली होती.
शाहीन बागेत सुरक्षा कारणावरून दिल्ली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. परंतु , नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरूद्ध निदर्शने अजूनही सुरू आहे.
दरम्यान दिल्लीत झालेल्या दंगलीत आतापर्यंत 42 लोक ठार झाले आहेत तर, दोनशेहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.