बारामती – बलात्कार, ऍट्रॉसिटी व अनैतिक मानवी व्यापारपासून संरक्षण गुन्ह्यातील चौघांची येथील जिल्हा न्यायाधीश बांगडे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. तांदुळवाडी (ता. बारामती) याठिकाणी 2019 साली एका लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
पार्टी झाल्यानंतर त्या ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करून बलात्कार झाल्याची तक्रार बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. त्यानुसार ऍट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. संशयित आरोपी म्हणुन रेश्मा अमोल भुजबळ, अमोल बबन भुजबळ, काका जोगदंड, अलाबक्श शेख (सर्व रा. जळोची बारामती) यांना अटक करण्यात आली होती.
बारामती न्यायालयात जिल्हा न्यायाधीश बांगडे यांच्या समोर हा खाटला सुरू होता. सरकारी पक्षाकडून एकुण 11 साक्षीदार तपासले होते, सबळ पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपींच्यावतीने ऍड. विकास शिपकुले, ऍड. अमोल गुलाबराव सातकर, ऍड. योगेश वाघमारे, ऍड. सचिन वाघ यानी काम पाहिले.