प्रगतीशील शेतकरी वसंतराव माणिकराव जगताप यांची कन्या कविता यांचा शुभविवाह आंबाडे ता. भोर येथील प्रगतीशील शेतकरी लालासाहेब भिकोबा खोपडे यांचे चिरंजीव भोर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोज खोपडे यांच्याशी झाला. सधन अशा बागायती क्षेत्रातून वीसगाव खोऱ्यातील आंबाडे गावात आल्यावर आपले पती मनोज खोपडे यांची असलेली राजकीय पार्श्वभूमी, त्यांची समाजाशी जुळलेली नाळ पाहून आपणही समाजासाठी काही तरी देणे लागतो या भावनेतून त्यांच्या कार्यात सहभागी होण्यास सुरुवात केली.
महिलांच्या सक्षमीकरण व सबलीकरणाच्या दृष्टीने गावातील महिलांची बचत ही त्यांच्याकडेच राहावी व त्यातून त्यांच्या कुटुंबाला हातभार लागावा यासाठी गावात 20 ते 22 महिला बचत गट हे नोंदणी करून त्यातून महिलांना छोट्या-छोट्या व्यवसायांसाठी कर्ज देणे, त्यांची कौटुंबिक गरज भागवणे, त्यांना व्यवसायासाठी प्रेरित करणे हे काम मागील पाच वर्षांपासून चालू आहे. महिला स्वतःची जबाबदारी स्वतः सांभाळण्यासाठी सक्षम झाल्या, त्याचबरोबर त्यांना व्यावहारिक व व्यावसायिक ज्ञान मिळाले.
मासूम आधार गटाच्या माध्यमातून गावात काम करत असताना महिलांवर अन्याय होऊ नये याकरिता महिलांना योग्य ते मार्गदर्शन केल्याने महिलांमधील भीतीची वातावरण कमी झाले.
.
सन 2021च्या आंबाडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून येत महिला सरपंच होण्याचा मान मिळवला. जानेवारी 2021 मध्ये सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारत असताना करोनाचे संकट आ वासून उभे होते. त्यास न डगमगता ग्रामस्थांच्या सहकार्याने करोना संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न केले. करोनासारख्या महामारीच्या काळात सर्व गावांच्या वेशीबाहेर ये-जा करण्यास बंद झाल्या होत्या. त्यावेळी ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध नागरिक यांच्यात भीतीचे वातावरण होते. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण घाबरलेले होते. अशा वेळी बॅंक समन्वयक म्हणून काम करत असताना बॅंकेत जमा होणारी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना तसेच मुलां-मुलींनी पाठवलेले पैसे सरकारी पेन्शनचे पैसे हे प्रत्येकाचे काढून त्यांना घरी नेऊन देणे. त्यामुळे प्रत्येकाची आर्थिक गरज भागवली गेली.
प्राथमिक आरोग्य केंद्र येथून तसेच मेडिकलमधून देखील गोळ्या-औषधे सर्व गरजू नागरिकांना पोहोचविणे, लक्षण दिसताच टेम्परएचर, ऑक्सिजन लेवल, हार्टबीट चेक करणे, योग्य ती उपाययोजना करणे, टेस्ट करण्यासाठी सांगणे, किंबहुना स्वतः ही जबाबदारी पार पाडणे, हॉस्पिटलमध्ये किंवा सेंटरमध्ये असणाऱ्या पेशंटची सर्व सोय करणे अशी समाजोपयोगी कामे केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबाडे आणि कोळेवाडीच्या शाळेची दुरुस्तीसाठी पुणे जिल्हा परिषदेचे आदर्श उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न करून निधी उपलब्ध केला. यात इमारत दुरुस्तीबरोबरच रंगकाम, खेळाचे साहित्य, कॉम्प्युटर, टी.व्ही. संच अशी अनेक उपकरणे घेऊन आंबाडे आणि कोळेवाडीची प्राथमिक शाळा अत्याधुनिक भौतिक सुविधांयुक्त केली आहे.विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व, बौद्धिक विकास करण्यासाठी सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहेत. आंबाडे आणि कोळेवाडीच्या अंगणवाडी नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून बाल विकासाला गती मिळाली. काळेश्वरी माध्यमिक विद्यालय आंबाडे येथे विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास, गुणवत्ता विकास खेळातील विविध प्राविण्य अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन तसेच स्पर्धा परीक्षाबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात येते. यामध्ये सक्रिय सहभागी होऊन विद्यार्थ्यांची व शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे
आंबाडे ते कोळेवाडी येथे 1200 मीटर रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजूर करून घेतला. पूर्वी आंबाडे ते कोळेवाडी येथे जाण्यासाठी कच्चा रस्ता होता. दळणवळण करणे, मोठ्या गाड्या, अवजड वाहने यांसाठी मोठ्या व चांगल्या रस्त्याची गरज होती. साधारण 425 लोकसंख्या असणारा हा आदिवासी कोळी समाजबांधव यांचा हा आदिवासी पाडा आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी ही समस्या सोडवण्यात यश मिळाले. आंबाडे गावठाण येथील मुख्य रस्ता हा आंबाडे गावाचे वैभव मानला जातो. त्यामुळे हा रस्ता बनवत असताना साधारण 700 मीटर डांबरीकरण व 250 मीटर कॉंक्रिटीकरण करून गावातील मुख्य चौक व रस्ता केला आहे. त्यामुळे अतिशय सुंदर व प्रशस्त असा हा चौक तयार झाला आहे.
आंबाडे गावठाणात अंतर्गत रस्ते व गटर व्यवस्था करण्यात आली. तसेच कोळेवाडी येथे अंतर्गत रस्ते व अंतर्गत गटराची व्यवस्था करण्यात आली. यामधून साधारण सर्व रस्ते कॉंक्रिटचे करण्यात आले आहेत. दलित वस्तीसाठी अंतर्गत रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला व दलित वस्तीमध्ये सर्व रस्ते कॉंक्रिटचे केले आहेत. आंबाडे म्हणजेच आमच्या गावामध्ये कित्येक वर्षापासून ग्रामपंचायत कार्यालय नव्हते; परंतु गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय पाहिजे आणि ते लोकांच्या सोयीच्या दृष्टीने अत्यंत चांगल्या पद्धतीचे असावे असा मानस होता. गावातील लोकांची कामे गावातच व्हावी या दृष्टीने जिल्हा परिषदमधून निधी मंजूर करून ग्रामपंचायत कार्यालय मंजूर करून घेतले व त्याचे काम प्रगतीपथावर आहे.
सरकारची जलजीवन मिशन या योजनेंतर्गत प्रत्येकाच्या घरी पाणी अथवा नळ ही संकल्पना रुजवत असताना नळ पाणीपुरवठा योजना मंजूर केली. या योजनेची अंमलबजावणी करत असताना गावांमधील पाण्याचे स्रोत वाढवणे, कोळे वस्तीवरील पाण्याची साठवण क्षमता वाढवणे, नैसर्गिक स्रोत उताराच्या पाईपलाईनने एकत्र करून एका ठिकाणी पाणी आणणे, नवीन विद्युत मोटर बसवणे इत्यादी कामे पूर्ण करून पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी, विहिरीपासून साठवण टाकीपर्यंत तसेच साठवण टाकीतून गावामध्ये घरोघरी वितरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यामुळे महिलांना विशेषतः उन्हाळ्यामध्ये पाण्याची अडचण भासत नाही महिलांसाठी व नवजात बालक व लहान मुलांसाठी विशेष सामाजिक उपक्रम राबवून गरोदर माता कुपोषित बालक यांच्यासाठी मार्गदर्शक शिबिरे व गरजेची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करून अनुसूचित जाती-जमातीच्या महिलांना व अशिक्षित महिलांना याबाबत पूर्ण माहिती दिली जाते . तसेच गावातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबांना आर्थिक मदत किंवा लाभ मिळावी त्याकरिता समाजकल्याण विभाग, महिला बालकल्याण विभाग, कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग असे जिल्हा परिषदेच्या विविध विभागातून गावातील कुटुंबांना शिलाई मशीन, पीठ गिरण, वॉटर सोलर, हिटर, कडबा कुट्टी, ताडपत्री अशा अनेक गरजू वस्तूंचा लाभ मिळवून दिला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना देखील गरजेच्या वस्तू मिळवून दिल्या आहेत. जानेवारी 2021 ते मे 2022 या सरपंचपदाच्या कालावधीत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाच कोटींची कामे करण्यात आली. त्याचबरोबर काही कामे प्रगतीपथावर आहेत. नुकतीच त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने भोर तालुका व्यापार व उद्योग सेलच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
विकासकामे
आंबाडे-कोळवाडी रस्ता 1. 35 कोटी
प्राथमिक शाळा ते
आंबाडे रस्ता 35 लाख
गाव अंतर्गत रस्ते 15 लाख
आंबाडे शाळादुरुस्ती 32.75 लाख
कोळेवाडी शाळादुरुस्ती 20.77 लाख
अंगणवाडी इमारत कोळेवाडी 7 लाख
अंगणवाडी इमारत आंबाडे 8.50 लाख,
स्मशानभूमी इमारत 8 लाख
ग्रामपंचायत कार्यालय इमारत 15 लाख
जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना 1.31 कोटी
शाळा दुरुस्ती व संरक्षक भिंत 11 लाख
समाजमंदिर इमारत 7 लाख
सभामंडप 7 लाख
जिल्हा परिषद निधीमधून गाव अंतर्गत रस्ता व गटर 17 लाख
बंधारा बांधणे 31 लाख
मुख्य रस्त्यावर साकव बांधणे 60 लाख
भीमनगर ओटा कॉंक्रिटीकरण 7 लाख
कोळेवाडी अंतर्गत रस्ता व गटर 14 लाख
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दुरुस्ती 3 लाख
जि. प. प्राथमिक शाळा क्रीडा साहित्य 2.50 लाख
आंबाडे गावठाण ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता 10.00 लाख
कोळेवाडी स्मशानभूमी 5.60 लाख
कोळेवाडी स्मशानभूमी सुधारणा 3 लाख
अंगणवाडी इमारत आंबाडे 8.50 लाख
विशेष सहकार्य
आंबाडे-कोळेवाडी ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य सर्व ग्रामस्थ मंडळ आंबाडे-कोळेवाडी.
संकलन : दीपक येडवे, वीसगाव खोरे