मुंबई – मुंबईचे माजी रणजी क्रिकेटपटू राहुल मांकड यांचे नुकतेच येथे निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी निशिता, दोन मुली असा परिवार आहे.
माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विनू मांकड हे त्यांचे वडील होत. सलामीवीर राहुल यांनी 47 सामन्यांत 2111 धावा केल्या. यात 5 शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश होता. रणजी विजेत्या मुंबईच्या संघाचे ते चार वेळा सदस्य होते.