पुणे – दृष्टिहिनांसाठी देशातील सर्वात मोठ्या बुद्धिबळ स्पर्धांपैकी एक असलेली मसावा हर्बल्स एआयसीएफबी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा येत्या 5 ते 9 एप्रिल या कालावधीत पुण्यात होणार आहे.
ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर ब्लाइंड (एआयसीएफबी) आणि रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज यांनी संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केली आहे. महिला, पुरुष आणि 19 वर्षांखालील अशा तिन्ही गटातील स्पर्धकांचा यामध्ये सहभाग असून स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणारे स्पर्धक आगामी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील.