Former Pakistan captain Saeed Ahmed – पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू सईद अहमद यांचे निधन झाले आहे. ते काही काळ आजारी होते. वयाच्या 86 व्या वर्षी लाहोरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये शोककळा पसरली आहे.
सईद यांनी कारकिर्दीत 1958 ते 1973 पर्यंत पाकिस्तानसाठी 41 कसोटी सामने खेळले. या काळात त्यांनी 1969 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्वही केले होते. सईद यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 2991 धावा केल्या, ज्यात पाच शतकांचा समावेश आहे. यापैकी त्यांनी केवळ भारताविरुद्ध तीन शतके झळकावली.
दिग्गज महिला क्रिकेटपटूची T20 विश्वचषकापूर्वी निवृत्तीची घोषणा; 15 वर्षांची कारकीर्द संपली…
फलंदाजीसोबतच त्याने गोलंदाजीतही महत्त्वाचे योगदान दिले. सईद अहमद यांनी ऑफस्पिनर म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये 22 विकेट्सही घेतल्या आहेत. सईद यांचा जन्म स्वातंत्र्यापूर्व भारतात 1937 मध्ये जालंधर येथे झाला होता. त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.