Babar Azam And Mohammad Rizwan : 2023 च्या विश्वचषकानंतर पाकिस्तान क्रिकेट संघात अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. संघात सर्वात मोठा बदल कर्णधाराच्या रूपाने पाहायला मिळाला. विश्वचषकात संघाचे नेतृत्व करणाऱ्या बाबर आझमने स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर राजीनामा दिला होता. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बाबर आझम आपल्याच संघाचा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानच्या मागे बॅट घेऊन धावताना दिसत आहे.
व्हिडिओ हा सरावाच्या दरम्यानचा आहे, जिथे बाबर फलंदाजी करताना आणि रिजवान कीपिंग करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, चेंडू रिझवानकडे जातो आणि बाबर आझमला क्रीजमधून बाहेर येताना पाहून रिझवान स्टम्पवर चेंडू फेकतो आणि हसत-हसत टाळ्या वाजू लागतो. त्यानंतर काही वेळाने तो बाबरच्या विकेटसाठी अपील करताना दिसतो. रिझवानला अपील करताना पाहून बाबर आझम त्याच्या पाठीमागे गमती-जमती (मजेदार शैली) मध्ये बॅट घेऊन धावतो. बाबर रिजवानला असं बरेच अंतर पळायला लावतो.
Babar 😭😭 pic.twitter.com/OnLIv1t4A7
— Hassan (@HassanAbbasian) November 25, 2023
पाकिस्तानचा पुढचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. पाकिस्तान संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी पाकिस्तानचा संघ सराव करत आहे. यादरम्यानचा हा मज्जेदार किस्सा असून पाकिस्तान संघातील खेळाडूमध्ये आपापसात कोणत्याही प्रकारचा वादविवाद नाही.
दरम्यान, बाबर आझमच्या राजीनाम्यानंतर शान मसूदला पाकिस्तानच्या कसोटी संघाचा कर्णधार आणि शाहीन शाह आफ्रिदीला T20 आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत शान मसूद पाकिस्तानचे नेतृत्व करणार आहे. मात्र, बाबर आझम हा खेळाडू म्हणून संघाचा भाग राहणार असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे.