रेडा – राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे जवळचे नातलग व इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांतराव पाटील यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू व भाजपचे नेते प्रशांतराव पाटील यांची मागील काही वर्षापासून भारतीय जनता पार्टी मध्ये घुसमट होत होती.त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या संपर्क मध्ये माजी सभापती प्रशांतराव पाटील मागील कालावधीत अनेक वेळा आले.सन 1996 मध्ये प्रशांतराव पाटील यांनी बावड्याचे पाटील घराणे एकत्र करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली होती.अत्यंत अभ्यासू आक्रमक म्हणून प्रशांतराव पाटील इंदापूर तालुक्याला नव्हे तर पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत.
प्रशांतराव पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यामुळे,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राहत्या बावडा गावात व बावडा – लाखेवाडी जिल्हा परिषद मतदार संघात,तसेच इंदापूर तालुक्यात राजकीय प्रचंड मोठा परिणाम होणार आहे.सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पहिल्यांदाच बावडा येथील प्रसिद्धध असणाऱ्या पाटील घराण्यात जनाधार प्राप्त झाला आहे.इंदापूर तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखाना तसेच इतर संस्थांमध्येेेे व पंचायत समितीमध्ये प्रशांतराव पाटील यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनेेे काम केले आहे.याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इंदापूर तालुक्यात होणार आहे.
पुणे येथील शासकीय विश्राम धाम येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीमध्ये भाजप नेते प्रशांतराव पाटील तसेच त्यांचे चिरंजीव संग्राम पाटील कुलदीप पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश शुक्रवार (ता.15 रोजी) झाला.यावेळी सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रेय घोगरे,तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे,तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे,तालुका उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर, इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजीराव इजगुडे,सचिन सपकाळ, रणजित घोगरे,अँड.संचित हांगे व इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
” माझा प्रवेश ट्रेलर …. पिक्चर बाकी “
इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांतराव पाटील प्रवेश केल्यानंतर म्हणाले की,इंदापूर तालुक्याची जडण-घडण काँग्रेस विचारातून झाल्यामुळे आमची भारतीय जनता पार्टीमध्ये प्रचंड घुसमट होत होती.माझा जो प्रवेश झालेला आहे.तो टेलर आहे पिक्चर बाकी है अशी शायरी करत इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस बलवान बनवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार अशी ग्वाही देत प्रशांतराव पाटील म्हणाले की,राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर खासदार सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार आहेत व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत.यांच्याच माध्यमातून इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो असा मला विश्वास आहे. अशी प्रतिक्रिया सभापती प्रशांतराव पाटील यांनी दिली.
” प्रशांतराव पाटील यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस आणखी दमदार होईल “
इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांतराव पाटील यांना सामाजिक राजकीय कामाचा अत्यंत अनुभव असल्यामुळे व बावडा परिसरात अनेक कुटुंबांची ऋणानुबंध पाटील यांचे असल्यामुळे इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस दमदार होण्यासाठी मदत होईल अशी माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.