मुंबई – टी सिरीज या चित्रपटसृष्टीतील विख्यात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भुषणकुमार यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुषणकुमार हे या कंपनीचे दिवंगत प्रमुख गुलशन कुमार यांचे चिरंजीव आहेत.
एका 30 वर्षीय महिलेने त्यांच्या विरोधात अंधेरीतील डी. एन. नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर महिलेला आपल्या कंपनीत काम देण्याच्या अमिषाने त्याने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याची तिची तक्रार आहे. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी भुषणकुमार यांच्यावर आयपीसी 376, 420, 506 इत्यादी कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
टी सीरिज ही कंपनी कॅसेटकिंग गुलशनकुमार यांनी स्थापन केली होती. त्यांची 1997 साली अंधेरीतच हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांचे चिरंजीव भुषणकुमार यांनी या कंपनीची धुरा सांभाळली. ही कंपनी संगीताबरोबरच चित्रपट निर्मीती व वितरणाचेहीं काम करते.
भुषणकुमार हा आपल्याला गेली तीन वर्षे फसवत होता. व त्याने वेळोवेळी आपल्यावर बलात्कार केला असेही या महिलेचे म्हणणे आहे. आपले व्हिडीओ व्हायरल करण्याचीहीं धमकी त्याने दिली आहे असेही तिचे म्हणणे आहे.