-
पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील.
-
पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे.
-
धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.
-
पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी “सेल्फी’ काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे.
-
पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतूक करणे, अनाधिकृत मद्यविक्री करणे व उघड्यावर मद्यसेवन करणे.
-
वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे.
-
वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन “ओव्हरटेक’ करणे.
-
सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लॅस्टिकचे साहित्य उघडयावर व इतरत्र फेकणे.
-
सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल, असे कोणतेही वर्तन करणे.
-
धबधब्याच्या 1 किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी.