नवी दिल्ली : प्रवासादरम्यान किंवा पचन न झाल्यामुळे लोकांना उलट्या होतात. एखाद्याला उलटी करताना पाहून किंवा मनात उलटीचे विचार जरी आले तरी आपण अस्वस्थ होतो. मात्र एखाद्याची उलटी चक्क बाजारात करोडो रुपयांना विकली जाऊ शकते, यावर तुमचा विश्वास बसेल? कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण हे अगदी खरे आहे. वास्तविक असा एक प्राणी आहे ज्याच्या उलटीची किंमत बाजारात एक कोटींपेक्षा जास्त आहे.
तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच पडत असेल की बाजारात एखाद्या प्राण्याची उलटी का विकली जात असेल? ती एवढी रक्कम मोजून कोण विकत घेत असेल ? या उलटीचे नेमके काय होते? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की व्हेल माशाची उलटी बाजारात करोडोंना विकली जाते. व्हेलच्या उलटीला तरंगणारे सोने म्हणतात. तुम्ही विचार करत असाल की या माशाच्या उलटीमध्ये असे काय आहे की त्याची इतकी किंमत आहे? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की व्हेल माशाची उलटी इतकी महाग का विकली जाते?
तुम्ही प्राण्यांच्या तस्करीबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. जनावरांच्या हाडांपासून ते कातड्यापर्यंत बेकायदेशीरपणे विक्री केली जाते. हस्तिदंत, अनेक प्राण्यांचे कातडे आणि गेंड्याच्या शिंगाची बाजारात किंमत जास्त आहे. याशिवाय व्हेल माशांच्या उलटीचीही तस्करी केली जाते.
* व्हेल माशाची उलटी म्हणजे काय ?
व्हेल माशाच्या उलटीला ‘अँबरग्रीस’ म्हणतात. तज्ज्ञांच्या मते, हा व्हेलच्या शरीरातून बाहेर पडणारा कचरा आहे. हा पदार्थ व्हेलच्या आतड्यातून बाहेर पडतो. हा मासा समुद्रातील अनेक गोष्टी खातो. जेव्हा त्याला या गोष्टी पचवता येत नाहीत तेव्हा तो हे उलटीच्या स्वरूपात बाहेर फेकून देतो. अँबरग्रीस हा राखाडी किंवा काळ्या रंगाचा घन पदार्थ आहे. एक प्रकारे तो मेणापासून बनवलेल्या दगडासारखा घन पदार्थ आहे.
* व्हेल माशाची उलटी इतकी महाग का विकली जाते?
व्हेल माशाच्या आतड्यातून बाहेर पडणाऱ्या या पदार्थाचा अतिशय सुगंधी वास येतो. त्यामुळे सुगंधी परफ्यूम बनवणाऱ्या कंपन्या त्याचा वापर करतात. या परफ्यूमचा सुगंध बराच काळ टिकून राहतो. परफ्यूम बनवणाऱ्या कंपन्या ते महागड्या किमतीत विकत घेतात.
* औषध म्हणून देखील ही उलटी वापरले जाते
व्हेलची उलटी औषध म्हणून देखील वापरली जाते. अँबरग्रीसचा उपयोग लैंगिक समस्यांवर उपचार करण्यासाठी देखील केला जातो. यामुळे याची किंमत इतकी जास्त आहे. म्हणूनच व्हेल माशाच्या उलटीला शास्त्रज्ञांनी ‘तरंगणारे सोने’ म्हटले आहे.