नवी दिल्ली – आगामी ‘आशिया चषक 2023’ स्पर्धेसाठी पाकिस्तान यजमान राष्ट्र आहे. ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांमध्ये होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया या आशियाकप 2023 मध्ये खेळणार आहे. आशिया कपच्या आधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, एकच खळबळ उडाली आहे.
मात्र, हे फोटे व्हायरल होण्या मागे विशेष कारण आहे. आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या जर्सीवर ‘पाकिस्तना’च्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. टिम इंडियाच्या जर्सीवर पहिल्यांदाच ‘पाकिस्तान’ असं नाव दिसून आल्याने सोशल मीडियावर देखील हे फोटो वेगाने व्हायरल झाले आहेत. क्रिकेट प्रेमी देखील यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
Through thick & thin, fans always have their hands up in support of #TeamIndia. Now, we back them to conquer both Asia & the world! 🙌🏻🏆
Tell us your favourite #HandsUpForIndia moment in the comments.
Tune-in to #AsiaCupOnstar
Aug 30 Onwards | Star Sports Network#Cricket pic.twitter.com/z7zSlbqBfz— Star Sports (@StarSportsIndia) August 8, 2023
यंदाच्या आशिया चषक स्पर्धेसाठी ‘पाकिस्तान’ हा मुख्य यजमान आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी संघांना आपल्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव लिहावं लागेल. त्यामुळेच भारतीय संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव लिहिलं जाण्याची शक्यता आहे.
भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव आशिया कपच्या लोगोच्या खाली असेल. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ 2 सप्टेंबरला आपला पहिला सामना खेळणार आहे. पहिल्या सामन्यात भारताचा मुकाबला पाकिस्तानशी होणार आहे.