Mumbai – Ahmedabad Bullet Train Project – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आणि देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे (मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प) काम वेगाने सुरू आहे. मुंबईतही बुलेट ट्रेनच्या कामाला वेग आला आहे. अहमदाबाद ते मुंबई धावणारी बुलेट ट्रेन ठाण्यातील शीळ फाट्यापर्यंत उंच किंवा जमिनीच्या वर असेल. परंतु शीळ फाटा ते बीकेसीपर्यंत ती बोगद्यामधून जाईल.
७ किलोमीटरचा भाग समुद्राखाली –
सुमारे २१ २१ किलोमीटरचे हे अंतर पूर्णपणे भूमिगत असेल. त्यातही ७ किलोमीटरचा भाग समुद्राखाली असेल. देशात प्रथमच समुद्राखालून ट्रेन धावणार आहे. विक्रोळी, बांद्रा-कुर्ला काॅंप्लेक्स अर्थात बीकेसी आणि शीळ फाटा येथे २१ किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यासाठी आज ब्लास्टिंग करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री अश्वनी वैष्णव देखील उपस्थित होते.
खोदाईचे काम सुरू –
वांद्रे येथील मुंबई हायस्पीड रेल्वे स्थानकावर ३६ मीटर खोलीवर शाफ्ट-१ बांधण्यात येत असून, तेथे दुसऱ्या पायलिंगचे काम फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाले होते, आता फक्त खोदाईचे काम सुरू आहे. तर विक्रोळीतील शाफ्ट-२ ची खोली ३६ मीटर असून, त्यातही पायलिंगचे काम पूर्ण झाले असून येथेही खोदकाम सुरू आहे.
दोन्ही शाफ्टचा वापर दोन टनेल बोरिंग मशीन विरुद्ध दिशेने कमी करण्यासाठी केला जाईल. एक बीकेसीच्या दिशेने बोअर करेल आणि दुसरा घणसोलीकडे जाईल. घणसोलीजवळील सावली येथे ३९ मीटर खोल शाफ्ट-३ चे खोदकाम सुरू आहे, तर शिळफाटा येथील बोगद्याच्या शेवटी असलेल्या जागेवर पोर्टलचे काम सुरू झाले आहे.