Retired Assistant Commissioner of Police Mukund Gole passed away पुणे – महाराष्ट्र पोलिस दलामध्ये उकृष्ट कामगिरी केल्याबद्दल दोन वेळा राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आलेले निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त मुकुंद विश्वनाथ गोळे यांचे शुक्रवारी सकाळी (२३ फेब्रुवारी २०२३) रोजी पुणे येथे निधन झाले. ते ८० वर्षाचे होते. राजेंद्र गोळे, उपसंचालक भूमी अभिलेख (नागरी भूमापन) संलग्न जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे यांचे ते वडील होत. त्यांच्यामागे मुलगा राजेंद्र, मुलगी मानसी आणि नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी शनिवार (दि. २४) वैकुंठ स्मशान भूमी, नवी पेठे येथे, दुपारी १२.३० वाजता होणार आहे, असे गोळे परिवाराकडून सांगण्यात आले आहे.
गोळे यांचा जन्म २ जुलै १९४४ रोजी पुण्यात झाला. त्यांना १९९३ आणि २००२ मध्ये दोनदा उल्लेखनीय सेवा आणि गुणवतेबद्दल राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यांनी पुणे, नाशिक, ठाणे, कोल्हापूर येथे वाहतूक आणि गुंन्हे शाखेमध्ये उल्लेखनीय काम केले. त्यांनी पुण्यात प्रथम संगणकावरआधारित वाहतूक प्रणाली विकसित केली होती.