ब्युनोस आयर्स – अर्जेन्टिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी करोनातून पूर्ण बरा झाला असून तो फ्रान्समध्ये दाखलही झाला आहे. मेस्सी पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) संघाकडून युरोपमधील विविध स्पर्धांमध्ये खेळणार आहे.
काही दिवसांपूर्वीच मेस्सीसह पीएसजीच्या चार खेळाडूंना करोना झाल्याचे समोर आले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा केलेल्या करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मेस्सी अर्जेंटिनामधील रोझारिओ येथून फ्रान्सला रवाना झाला होता.