सर्वाधिक कमाईत पुन्हा रोनाल्डोच अव्वल

लिस्बन – पोर्तुगालचा जागतिक स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो पुन्हा एकदा सर्वाधिक कमाई करणारा फुटबॉलपटू ठरला आहे. त्याने अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला मागे टाकले आहे.

फोर्ब्सकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत रोनाल्डो याने 125 मिलियन डॉलर्सची कमाई केली आहे. रोनाल्डो याच्यासाबेत मॅंचेस्टर युनायटेड क्‍लबने करार केला आहे.

मेस्सीची कमाई 110 मिलियन डॉलर्स असून, तो द्वितीय क्रमांकावर आहे. या दोघांसह नेमार, किलीयन एम्बाप्पे व महंमद सलाह यांचा क्रमांक लागतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.