पुणे – पुण्यात सापडलेल्या “ओमायक्रॉन’ बाधित व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमधील आणखी 17 जणांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यांच्यासह आजपर्यंत 42 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
पिंपरी येथे सहा आणि पुण्यात एक असे सहाजण “ओमायक्रॉन’चे बाधित आढळले होते. पुण्यात सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कातील सर्व नातेवाईकांसह ते ज्या सोसायटीत राहतात त्यांची “आरटी-पीसीआर’ टेस्ट करण्यात आली. त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये सुमारे आठ दिवसांच्या कालावधीत 42 जण होते. त्या सगळ्यांची टेस्ट करण्यात आली.
त्यामधील उरलेल्या 17 जणांचा करोना टेस्ट अहवाल मंगळवारी आला. त्यात सगळ्याची टेस्ट निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. महापालिका हद्दीमध्ये परदेशातून आलेल्या सगळ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. त्यांची लिस्ट आल्यानंतर त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून त्यांची “आरटी-पीसीआर’ टेस्ट केली जात आहे.