पॅरिस – लिओनेल मेस्सी आणि इद्रीस गनगे यांनी केलेल्या गोलच्या जोरावर पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) संघाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत मॅंचेस्टर सिटीचा 2-0 असा पराभव करत आगेकूच केली.
मेस्सी, नेमार, किलियान एम्बापे या बीएसजीच्या बलाढ्य खेळाडूंसमोर मॅंचेस्टर सिटीला वर्चस्वच राखता आले नाही. पीएसजीशी करार झाल्यापासून तीन सामन्यांत मेस्सीला एकही गोल करता आलेला नव्हता. मात्र, या लढतीत त्याने अपयश पुसून काढताना गोल केला.
घरच्या मैदानावर खेळणाऱ्या पीएसजीने मॅंचेस्टर सिटीचा 2-0 असा पराभव केला. मेस्सीनंतर गनगेनेही गोल केला. गनगेने 8 व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या हाफमध्ये 74 व्या मिनिटाला एम्बापेने दिलेल्या पासवर मेस्सीने गोल केला.
या गोलसह मेस्सीने आपला 121 वा गोल नोंदवला. त्याने यापूर्वी बार्सोलोनाकडून खेळताना 120 गोल केले होते तर, पीएसजीकडून हा त्याचा पहिलाच गोल ठरला. लीग फुटबॉल स्पर्धेतील त्याचा हा 673 वा गोल ठरला. मॅंचेस्टर सिटीला तब्बल दीड वर्षांनंतर प्रथमच चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या साखळी सामन्यात पराभूत व्हावे लागले