रेडा – लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरीदेखील, शासनस्तरावरून दिल्या गेलेल्या सूचनांचे पालन करुन कुटुंबाची तसेच गावाची आरोग्य संदर्भात काळजी घ्यावी, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी केले.
ग्रामपंचायतीच्या वतीने व्यवसायिक गाळाधारक व व्यापारी वर्गाच्या विशेष बैठकीत ते बोलत होते. यावेळी सरपंच सोमनाथ गायकवाड, उपसरपंच सदाशिव बागल यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते. यावेळी व्यापाऱ्यांनी सकाळी आठ ते संध्याकाळी सहापर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.