नागपूर : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले.
आज शासकीय कार्यालये तसेच अन्य संस्थामध्येही ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नागपूरमधील मुख्यालयातही आज सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला. यावेळी राष्ट्रगीतासह राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.
नागपूरमध्ये आरएसएसच्या मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी भागवत यांच्यासह आरएसएसमधील वरिष्ठ पदाधिकारी तसेच स्वसंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर येथे राष्ट्रगीत आणि भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.
स्वाधीनता का अमृत महोत्सव मनाएँ.
हर घर तिरंगा फहराएँ.
राष्ट्रीय स्वाभिमान जगाएँ. pic.twitter.com/li2by2b0dK— RSS (@RSSorg) August 13, 2022