मुंबई – आज स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त अनेक दिग्गजांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ज्यामध्ये सेलिब्रेटींसह क्रीडा उद्योग अशा सर्व क्षेत्रातील दिग्ग्जचा समावेश आहे. अभिनेता अनिल कपूरने देखील आपल्या झक्कास स्टाईलने देशप्रेम दाखवल्याचे पाहायला मिळतंय.
स्वातंत्र्य दिन अनिल कपूरने केवळ खास पद्धतीने साजरा केला नाही तर तरुणांना प्रेरणा देण्याचाही प्रयत्न केला आहे. 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अनिल कपूरने हातात तिरंगा घेऊन लाँग मार्च केला आणि यावेळीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. ६५ वर्षाचा असूनही अनिल कपूरने दाखवलेला उत्साह पाहून अनेक चाहत्यांनी बोलेतो एकदम झक्कास अशा कमेंट केल्या आहेत.
व्हडिओमध्ये अनिल कपूर संपूर्ण ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे तसेच त्याने हातात तिरंगा पकडलेला दिसत आहे. व्हिडिओ सुरू होताच अनिल कपूर हातात तिरंगा घेऊन धावू लागतो. पुढे अनिल कपूर हळू हळू वेग वाढवत धावताना दिसत आहे. व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर वंदे मातरम ऐकू येत आहे.
View this post on Instagram
अनिल कपूरचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.त्यांच्या या व्हिडिओवर त्यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूरनेही हार्ट इमोजी पोस्ट केले आहे.