Lok Sabha Election 2024 । महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (दि. 19 एप्रिल) रोजी नागपूर लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे. भाजप विरुद्ध काॅंग्रेस अशी थेट लढत याठिकाणी पहायला मिळणार आहे. भाजपकडून नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना तर काॅंग्रेसने विकास ठाकरे (Vikas Thakre) यांना उमेदावारी दिली आहे.
दरम्यान नितीन गडकरी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून नागपूरमध्ये प्रचार करतांना दिसत आहे. त्यांनी नागपूर शहरात भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शनीही केले होते. तसेच नागपूर लोकसभा मतदारसंंघात प्रचाराकरीता कार्नर सभा घेत आहे. गडकरींच्या कुटुबांतील सदस्य सुद्धा त्यांचा प्रचाराकरतांना दिसत आहे. नागपूर शहरात नितीन गडकरी स्वतःही प्रचाराकरीता फिरतांना दिसत आहे.
अशात त्यांना एक जुना व्हिडिओ सोशलं मीडिया व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ वाशिम राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यक्रमातील आहे. ते म्हणाले,’मी जे काही बोललो, ते केलं नाही असं कोणी म्हणू शकत नाही. जे बोलतात ते करतात आणि जे करतात तेच बोलतात. राजकारणात खोटं बोलण्याची गरज नाही. मी ठरवलय यावेळी लोकसभा निवडणुकीच्यावेळी पोस्टर-बॅनर लावणार नाही. चहा-पाणी करणार नाही. मत द्यायचय द्या, नाही द्यायचय नका देऊ. प्रामाणिकपणे सेवा करीन. कुठलीही माल-पाणी मिळणार नाही. लक्ष्मी दर्शन होणार नाही. देशी-विदेशी नाही मिळणार. मी पैसा खाल्ला नाही, तुम्हालाही खाऊ देणार नाही” असे ते या व्हिडिओत बोलतांना दिसत आहे. आता या व्हिडिओवरून सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे. अनेक युजर्सने या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे.
हे वाचलं का ? ‘नवरात्रीत मांसाहार खात असल्याचे दाखवून तुम्ही कुणाला खुश करताय?’ पीएम मोदींचा हल्लाबोल