भवानीनगर -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिव भोजनाचा लाभ घेणाऱ्या दोनशे व्यक्तींना तसेच इतर ठिकाणी पाचशे मास्कचे वाटप प्रशांत फर्निचर ऍण्ड इलेक्ट्रॉनिक शोरूमच्या वतीने करण्यात आले.
अजित पवार यांच्या सामाजिक कामाची प्रेरणा घेऊनच आम्ही आमच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले होते.
इंदापूर तालुका सावता परिषदेचे अध्यक्ष प्रकाश नेवसे यांच्या वतीने वालचंनगर पोलीस स्टेशन, भवानीनगर पोलीस दूरक्षेत्र, महावितरण विभाग सणसर येथे मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रशांत नेवसे, यशवंत नरुटे, बाळासाहेब नेवसे, गोकुळ उबाळे, दीपक नेवसे, रामदास पवार, सोमनाथ नेवसे उपस्थित होते.