‘म्हाडा’तर्फे पुणे विभागात साडेपाच हजार घरे, वाचा ‘लोकेशन’ आणि अर्ज कोठे करावा

आजपासून ऑनलाइन नोंदणी : जानेवारीत सोडत

पुणे – पुणे विभाग गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांच्या सोलापूर, कोल्हापूर, सांगली व पुणे येथील विविध योजनांतील 5 हजार 647 सदनिका विक्रीसाठी ऑनलाइन सोडत जानेवारीत काढण्यात येणार आहे. यासाठी गुरुवारपासून (दि.10) अर्ज नोंदणी होणार आहे.

 

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, प्रधान सचिव एस. व्ही.आर श्रीनिवासन्, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली.

 

‘येथे’ मिळणार हक्काचे घ

याअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतून पुणे जिल्ह्यात म्हाळुंगे (चाकण) येथे 514, तळेगांव दाभाडे येथे 296, तर म्हाडा अंतर्गत पुणे येथील मोरवाडी पिंपरी येथे 87, पिंपरी वाघेरे येथे 992 अशा एकूण 1079 सदनिका आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजतेंतर्गत म्हाळुंगे येथे 1,880, दिवे-14, तर सासवड येथे 4 सदनिका आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यात 82 सदनिका आहेत, अशा एकूण 1,980 सदनिका आहेत. यात 20 टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत पुणे महानगरपालिका येथे 410, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका येथे 1 हजार 20 सदनिका आहेत.

 

 

येथे करा अर्ज

इच्छुकांनी 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपासून ते 11 जानेवारीच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी केले आहे.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.