डिसले गुरूजींना करोनाची लागण

सोलापूर – ग्लोबल टिचर अवाॅर्ड जिंकलेले झेडपी शिक्षक रणजितसिंह डिसले गुरूजी यांना करोनाची लागण झाली आहे. बुधवारी सकाळी करोना चाचणीत त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. याबाबत त्यांनी स्वत:हून व्हाॅट्सअपवर स्टेटस ठेवून माहिती दिलीय.

दरम्यान, डिसले गुरूजींना गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय ग्लोबल टिचर अवाॅर्ड जाहीर झाला आहे. त्यानंतर त्यांच्यावर संपूर्ण राज्यातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. गेल्या काही दिवसांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांसह अनेक लोकप्रतिनींनी अभिनंदन करताना त्यांच्याशी चर्चा केली होती.

डिसले गुरूजींनी संपर्कात आलेल्या मंडळींना करोना टेस्ट करून घेण्याची विनंती केली आहे. मुंबईहून गावी आल्यानंतर त्यांना लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्यांनी स्वत:सह घरातील सर्वांची करोना चाचणी करून घेतली. त्यात त्यांच्यासह पत्नीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून बाकिच्यांच्या अहवाल निगेटिव्ह आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.