अंमली पदार्थ विरोधी पथकाची(पुर्व) कामगिरी
पुणे,दि.12- अंमली पदार्थ विरोधी पथकाने(पुर्व) एरंडवणा येथे छापा टाकूण 21 किलो 500 ग्रॅम गांजासह 4 लाख 70 हजाराचा ऐवज हस्तगत केला आहे. याप्रकरणी संजय सोहन बाटुंगे(48,रा.ढेरे चाळ, खिलारेवाडी, कर्वे रस्ता) याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पोलिस निरीक्षक विजय टिकोळे, सहायक पोलिस निरीक्षक ढेंगळे, सहायक पोलिस फौजदार दिवेकर, शिर्के, पोलिस हवालदार बोमादंडी, यादव,महिला पोलिस हवालदार पिंजण, ढेबे, पोलिस कर्मचारी साळुंखे, शिंदे आणि मोहिते असे डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.
यावेळी पोलिस नाईक साळुंखे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन एरंडवणा येथील खोडीयार माता मंदिराजवळ येथील रस्त्यावर संजय सोहन बाटूंगेला अवैधरित्या गांजाची विक्री करताना पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून रक्कम रुपये 4,30,000 किंबतीचा 21 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा तसेच 40,000 किंमतीची ज्युपिटर टू व्हिलर असा एकूण रु. 4,70,000 किंमतीचा मुद्देमाल पंचनामा करुन जप्त करण्यात आला. त्याच्यावर आरोपीवर डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुद्देमालासह आरोपीस पुढील कारवाईसाठी डेक्कन पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.