Hindu Tempale in UAE: दीर्घकालीन प्रतिक्षेनंतर अयोध्येतील राम मंदिराचे अनेकांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. येत्या 22 जानेवारीला रामललल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. जगभर पसरलेले कोट्यवधी रामभक्त रामलल्लाच्या दरबारात कधी हजेरी लावतील याची वाट पाहत आहेत. यासाठी येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र एकीकडे हा जल्लोष असतानाच संयुक्त अरब अमिराती (UAE) राजधानी अबुधाबी येथे पहिले हिंदू मंदिर तयार केले जाणार आहे.
विशेष म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटनही होणार आहे. अबुधाबीमध्ये पहिले हिंदू मंदिर बांधणाऱ्या BAPS स्वामीनारायण या संस्थेने उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले आहे, जे त्यांनी स्वीकारले आहे.
हे अबू धाबीचे पहिले हिंदू मंदिर आहे, जे 14 फेब्रुवारीला उघडणार आहे, जे अल वाक्बा ठिकाणी 20,000 चौरस मीटरच्या जमिनीवर बांधले गेले आहे. या मंदिराची रचना अतिशय आधुनिक शैलीत करण्यात आली आहे. प्राचीन कला आणि आधुनिक स्थापत्यकलेनुसार असलेल्या या मंदिराचे नक्षीकाम अप्रतिम आहे. मंदिर शाही, पारंपारिक हाताने कोरलेल्या दगडांनी बांधले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये या मंदिराची पायाभरणी केली होती. अशा परिस्थितीत उद्घाटनापूर्वी अयोध्येच्या धर्तीवर येथेही जोरदार तयारी सुरू आहे. अबुधाबीमध्ये होणाऱ्या भव्य कार्यक्रमात भारतातील लोकही सहभागी होणार आहेत. भारत आणि UAE मधील चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी हे मंदिर खूप प्रभावी ठरेल. अबू धाबीमधील हे मंदिर केवळ पहिलेच नाही तर पश्चिम आशियातील सर्वात मोठे मंदिर आहे.