CM Shinde on MLA Disqualification – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला. अध्यक्ष नार्वेकर यांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सुनावणी घेतली होती. ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी निकाल दिला आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर, एकनाथ शिंदे समर्थक आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार तूर्तास तरी दूर झाली आहे. यासोबतच अध्यक्ष नार्वेकर यांनी, उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना देखील पात्र ठरवले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माध्यमांशी संवाद साधताना, विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र ठरवण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
विधानसभा अध्यक्षांवर पक्षपाताचे आरोप विरोधकांकडून करण्यात येत होते, त्या दबावातूनच अध्यक्ष नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र ठरवले काय? हे पाहावं लागेल असं विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या ठाकरेंच्या आमदारांना पात्र ठरवण्याच्या निर्णयाविरोधात पुढील पावले उचलणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. ( CM Shinde on MLA Disqualification )
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी बुधवारी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय दिल्यानंतर, ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या. ठाकरे गट या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आमदार अपात्रतेच्या प्रकरणात ठाकरेंच्या आमदारांना पात्र ठरवण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत पुढील पावलं उचलणार असल्याचं सांगितल्याने ही लढाई तूर्तास तरी संपणार नसल्याचं दिसतंय.
इतर घडामोडी
‘मोदी सरकार’चा दुसऱ्या टर्म’मधील अखेरचा अर्थसंकल्प; ‘या’ महत्वाच्या घोषणांची शक्यता
“मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत, तर फाशी घेईल”; शिंदे गटातील आमदाराचे वक्तव्य