Budget Session 2024 : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होत असून ते ९ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ फेब्रुवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरू होईल आणि त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाईल.
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सर्कारकरचा हा दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प ठरणार आहे.
असा असेल अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कार्यक्रम । Budget Session 2024
31 जानेवारीपासून होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला 2025 या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 31 जानेवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील.
यानंतर आर्थिक पाहणी अहवाल 31 जानेवारीलाच सादर केला जाणार आहे.
‘इलेक्शन’ बजेट ठरणार? । Budget Session 2024
अरर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी दुप्पट करण्याचा प्रस्ताव असू शकतो. एवढेच नाही तर महिलांबाबत काही मोठ्या घोषणाही केल्या जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा अखेरचा अर्थसंकल्प असल्याने या अर्थसंकल्पात मतदारांना आकर्षित करण्यासाठी घोषणांचा पाऊस पडतो का याकडे लक्ष असेल.
अन्य घडामोडी…
“मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत, तर फाशी घेईल”; शिंदे गटातील आमदाराचे वक्तव्य
निकालानंतर बच्च कडूंचा शिंदेंना सल्ला; म्हणाले,’चिन्ह भेटलं म्हणजे माणसं निवडून येतात, असं नाही’
अर्थसंकल्पीय अधिवेशनात काय होणार?
नुकत्याच झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. संसदेची सुरक्षा व्यवस्था भेदून झालेला हल्ला, लोकसभा व राज्यसभेतील विरोधी पक्षातील खासदारांचे घाऊक निलंबन यांमुळे हिवाळी अधिवेशन तापले. अशातच अर्थसंकल्पीय अधिवेशनात काय होत हे पाहावं लागणार आहे.